भारतीय जनता पार्टीची बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांची उद्या शनिवार रोजी (दि २३) औरंगाबाद शहरात बैठक होणार आहे. त्या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे,. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे उपस्थित राहाण्याची श्यक्यता भाजपातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी सर्व पक्षाकडून पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीकडून देखील निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रात येवून गेले. युतीच्या चर्चेसाठी खुद्द अमित शहा देखील आले होते. आता उद्या बुथ कमिटीसह शक्ती केंद्र प्रमुख, ता. अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सरपंच आदींचा श्रीहरी पव्हेलीन येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला अमित शहा उपस्थित राहणार आहे. अशी माहिती भाजपाकडून कळविण्यात आली आहे.